देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली आमच्या संस्थेची स्थापना झाली व नामवंत लेखक, विचारवंत यांनी या संस्थेची पायाभरणी केली.

प्रसारमाध्यम क्षेत्रात क्रांती घडून आल्यावर संस्थेच्या कार्याचा विविध क्षेत्रात विस्तार घडून आला व १९८३ साली विवेक व्यासपीठ साकारले. व्यासपीठाने आपल्या कार्यास सुरुवात केली व संस्था पब्लिक ट्रस्ट अँक्ट १९५० (Reg . Νο. MAH /F -19710 Bombay ), सोसायटी अँक्ट १८६० नुसार त्याचप्रमाणे ८०-जी अंतर्गत १९९७ साली या संस्थेची अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली.

राष्ट्रीय प्रश्नांवर समाजप्रबोधन करणे, प्रबोधनासाठी साहित्य प्रकाशित करणे, त्याचे अल्प किंमतीत वितरण करणे, ग्रामविकास प्रकल्पांना मदत करणे, ग्रामआरोग्य तसेच एड्स, कॅन्सरसारख्या दुर्धरव्याधिनसंबंधी जनप्रबोधन करणे इ. विषय विवेक व्यासपीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.

विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजजागृती घडून आणण्याचे कार्य प्रथम या व्यासपीठाने केले आणि त्याचा अनेकांना लाभ झाला.

 
Disclaimer