१. प्रजासत्ताक ५० -
(भारताच्या  स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे भारत सरकारने आयोजित केलेला उपक्रम) या अंतर्गत महाराष्ट्रासह दिव - दमण येथे ६५ ठिकाणी सांस्कृतिक तसेच विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला अनेक मान्यवरांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
 
२. राष्ट्रावंदना -
मार्च २००६ मध्ये राष्ट्रभक्तीपर गीतांवर आधारित राष्ट्रावंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मा. श्री. राजदत्त (ज्येष्ठ दिग्दर्शक) यांची उपस्थिती लाभली.
 
३. कोकम संमेलन -
ठाणे येथे कोकणी, कन्नड, मराठी या तीन्ही भाषांचा त्रिवेणी संगम असणारे कोकम संमेलन संपन्न करण्यात आले. या संमेलनात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
 
४. आयुर्वेदिक मेडिकल फौंडेशन -
वर्षभरात ४ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व यात सर्व वयोगटातून २५०० जणांचा सहभाग होता. सहानुभूतीच्या तत्वावर कार्य करण्यास तयार असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध कुशल तज्ञांना यात आमंत्रित करण्यात आले.
 
५. साहित्य संदर्भ केंद्र, मुंबई -
शैक्षणिक कार्यासाठी झटणाऱ्या आमच्या ध्येयातून एल्फिन्स्टन येथे एक साहित्य संदर्भ केंद्र स्थापन करण्यात आले आहे व या केंद्रात २००० हून अधिक पुस्तके आजमितीस सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
 
६. सांस्कृतिक विभाग आयोजित जिणे गंगौघाचे पाणी -
  • कविवर्य बा.भ. बोरकर जन्मशताब्दी निमित्ताने बोरकरांच्या साहित्यातील ताल, रंग, सूर, लय इत्यादी गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न.
  • आमी गोयंकार व संवाद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८/०२/२०१० रोजी सलील कुलकर्णी, डॉ. अरुणा ढेरे, सुहास बहुलकर, वासुदेव कामत, राजश्री शिर्के, नीला सोहनी, डॉ. कमल अभ्यंकर, निशा पारसनीस, सुरेश बापट, साई बँकर, आनंद गाडगीळ, उत्तरा मोने, मनीष बावकर, घनश्याम बोरकर इत्यादी  कलाकारांच्या  उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात.
  • हाच कार्यक्रम गोवा, कोल्हापूर, पुणे येथे  आयोजित करण्यात आला होता.
कविवर्य बा.भ. बोरकर जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त पोएट बोरकर स्पिकिंग हा कार्यक्रम दि. ३०/११/२०१० रोजी यशवंत नाट्य मंदिर , माटुंगा येथे सचिन खेडेकर, पं. शौनक अभिषेकी. डॉ. सलील कुलकर्णी, कौशल इनामदार, प्राजक्ता रानडे, आर्या आंबेकर , प्रमोद पवार, निशा पारसनीस आणि डॉ. अरुणा ढेरे इत्यादी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.
 
७.सांस्कृतिक विभाग आयोजित ......एक किरण सूर्याचा -
प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या कविता, त्यांच्या  नाटकातील स्वगत, साहित्यातील उतारे यांचे वाचन आणि गाण्यातून साहित्यिक व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा ......एक किरण सूर्याचा हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहाय्याने दि. ५/०४/२०११ रोजी नाशिकच्या कालिदास नाट्यगृहात श्रीधर फडके , डॉ. अरुण ढेरे, गिरीश साळवी, संजय मोने, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे इत्यादी कलाकारांच्या उपस्थितीत सदर करण्यात आला.
 
८. मृत्युंजय अमावास्या -
विवेक व्यासपीठ आयोजित  शिवसमर्थ प्रतिष्ठान निर्मित छत्रपती श्री. संभाजी महराज यांच्या जीवनावरील महानाट्य मृत्यंजय अमावास्या धगधगत्या स्वाभिमानाचा ज्वलज्वलनतेज अंगार - लेखक/दिग्दर्शक - नीलेश भिसे, गुरुवार दि. १७/११/२०११ रोजी सायं.७.०० वा. गणेश क्रीडा कला मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजित करण्यात आहे होते.
Disclaimer