साप्ताहिक विवेक  -
गेल्या ६० वर्षापासून सा.विवेक प्रकाशित होत आहे. सत्य व न्यायाची बाजू मांडण्यासाठी राष्ट्रीय विचारांच्या सा. विवेकचा जन्म झाला. राष्ट्रहिताची चेतना जागृत करण्यासाठी व समाजाच्या सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी आपले वैचारिक योगदान देऊन सा.विवेक कृतिशील पत्रकारितेची जबाबदारी सांभाळत आहे.  अथक परिश्रम आणि संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील लाखो वाचकांची आपुलकी. याच भांडवलाच्या आधारावर विवेक जन्माला, तीकॅला व वाढतो आहे. आजवर विवेकने समाजजीवनाच्या अनेक वाट प्रकाशमान केल्या. सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक माहितीविषयक उद्योग, पर्यटन, युवा जगात, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, संस्कृती या सर्वांच्या कालानुरूप बदलांचा सातत्याने वेध घेत आहे. लहानांपासून तसेच महिला व पुरुष वाचकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन समाजमन घडविण्यास विवेकची भूमिका सातत्याने महत्वपूर्ण ठरली आहे.
ज्येष्ठपर्व  -
ज्येष्ठांच्या मनातील विचारांना सर्वदूर पोहोचविण्यासाठी, विविध विषयांवर हितगुज करण्यासाठी जिवाभावाचा सर्हुद्य मित्र, तुमच्या मनातील विचारांचे एक मुक्त व्यासपीठ म्हणजेच ज्येष्ठपर्व. ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव पुढच्या पिढीला मार्गदर्शक कसे ठरू शकतात याच विचार या त्रैमासिकाच्या मांडणीत करण्यात आला आहे. म्हणूनच हे त्रैमासिक केवळ ज्येष्ठांपुरते मर्यादित न राहता युवकांनाही मार्गदर्शन करणारे आहे. थोडक्यात काय तर कुटुंबातील सर्वच सदस्यांना हवेहवेसे असेच आहे.
आज महाराष्ट्रात सुमारे ८५ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्कॉम या संघटनेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील १६०० ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सुमारे ३ लाख सदयांपर्यंत व सुसज्ज वितरण  यंत्रणेच्या सहाय्याने बुकस्टोल, ग्रंथायांमार्फात ज्येष्ठपर्व महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र पोहोचत आहे.
ज्येष्ठपर्वची वार्षिक वर्गणी रु. १००/- मात्र असून त्रैवार्षिक वर्गणी रु.२७५/- मात्र व पंचवार्षिक वर्गणी रु. ४५०/- मात्र आहे. वर्षातून एकूण चार अंक (दिवाळी अंकासहित) प्रसिध्द होतात. नेहमीच्या अंकाची किंमत रु. २०/- मात्र असून दिवाळी अंकाची किंमत्त रु.६०/- मात्र आहे. आपणास ज्येष्ठपर्वचे वर्गणीदार व्हायचे असल्यास आपली वर्गणी मनीऑर्डर अथवा विवेक व्यासपीठ या नावे काढलेल्या डी.डी. किंवा धनादेशाद्वारे (मुंबई बाहेरील असल्यास वाटनावळ शुल्क रु. २५/- मात्र अतिरिक्त)आमच्या प्रशासकीय कार्यालयात आपल्या पूर्ण पत्त्यासह पाठवावी.
वैद्यराज -
वैद्यराज व्हिजन  संस्था ही सार्वजनिक विश्वस्थ संस्था आयुर्वेद आणि आरोग्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत आहे. आयुर्वेदाचा शास्रोक्त पद्धतीने वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन संस्थेचे सदर क्षेत्रातील प्रचार - प्रसार व प्रसिद्धी कार्य चालू आहे. आयुर्वेद, निसर्गोपचार, योग आणि अध्यात्म याच्या अनुषंगाने आरोग्य केंद्र व रुग्णालयाची उभारणी, संशोधन केंद्राची स्थापना, शहरी व ग्रामीण भागात आयुर्वेद रोगनिदान चिकित्सा शिबिरे , औषधी वितरण व आयुर्वेद व्याख्यानमाला आणि आयुर्वेद प्रचार- प्रसारार्थ साहित्याचे प्रकाशन अशा अनेक प्रकारचे उद्देश संस्थेसमोर आहेत.
सध्या प्रकाशित होणारे त्रैमासिक वैद्यराज, जनीमनी आयुर्वेद पुस्तिका तसेच आयुर्वेद रुग्णनिदन चिकित्साशिबिरे, औषधी वितरण व लोकाभिमूख आयुर्वेद व्याख्यानमाला संस्थेतर्फे आयोजित केल्या जातात.या सर्व उपक्रमांमधून आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार जास्तीत जास्त व्हावा असा आमचा प्रयत्न असतो.
Disclaimer