१९९७ पासून विवेक व्यासपीठ ने महाराष्ट्रात तसेच इतरत्र सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहे. आजपर्यंत विवेक व्यासपीठतर्फे अनेक कार्यक्रम संपन्न करण्यात आले आहेत.

१.
वाशी, नवी मुंबई येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता ज्येष्ठपर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ज्येष्ठांचे आरोग्य व त्यांनी घ्यावयाची काळजी, आर्थिक समस्या व गुंतवणूक, कौटुंबिक समस्या, अध्यात्म इ. विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले. या समारंभाला मा. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावंकर, डॉ. चंद्रशेखर टिळक (ज्येष्ठ अर्थतज्ञ), संजीव गणेश नाईक (प्रथम महापौर, नवी मुंबई), सन्माननीय सच्चिदानंद शेवडे, डॉ. शं.पा. किंजवडेकर (अखिल भारतीय महासचिव , आईस्कॉन), मधुकरराव कुलकर्णी (अध्यक्ष, फेस्कॉम) यांचे मार्गदर्शन लाभले.
 
२.
माहिती तंत्रज्ञान, कॉर्पोरेंट कल्चर, ग्लोबलायझेशन या नव्या बदलत्या युगात यशस्वी होण्यासाठी तरुणांना विविध प्रश्नांना घेऊन युवा टेलिस्कोप ही योजना विवेक व्यासपीठतर्फे  आयोजित केली होती. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये तरुणांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमांत विविध करीयर क्षेत्रांची ओळख, त्यातील संधींची माहिती, नियोजन, व्यक्तिमत्व, आरोग्य या विषयांमध्ये तरुणांमध्ये जागरुकता व समुपदेशन केले होते. उद्योगाकता प्रेरणा, स्वयंरोजगार  माहिती व उद्योगाकता सहाय्यता निधी, शैक्षणिक सहाय्यता योजनांची माहिती व ती मिळवण्याकरिता मदत केली होती.
 
३.
नवी मुंबई येथील नेरूळ, तुर्भे स्टोअर - तुर्भे, पावणे कातकरी पाडा, संभाजीनगर रबाळे येथे गरीब वस्त्यांमध्ये बालवाड्या चालविल्या.
 
४.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मार्फत आशावादी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता व त्यावर श्री. सुरेश नाडकर्णी यांनी पुस्तिका प्रकाशित केली होती.
 
५.
दलित उद्योजक उपक्रम ( दीप एक्सपो २०१०) -
 
दलित इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री (डिक्की) व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दलित उद्योजकांचे सम्मेलन -दीप एक्सपो २०१० -दि. ४,५ व ६ जुने २०१० रोजी इंजिनियरिंग कॉलेज ग्राउंड, पुणे - ५ येथे सकाळी १० ते रात्रौ १० पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत दलित उद्योजकांनी केलेल्या कामाचा आढावा, त्यांच्या उत्पादनांची माहिती,त्यांच्या व्यक्तिगत मुलाखतीद्वारे  घेण्यात आली. तसेच या उद्योजकांच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये दीपस्तंभ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
 
६.
विवेक योगविद्या केंद्र -
 
आजच्या जीवनशैलीतील योग या विषयाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन आणि या सेवेचा उद्योजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पैलूंचा विचार करून व्यासपीठाने विवेक योगविद्या केंद्र या नावाने एक चळवळ सुरु केली आहे.
 
  • केंद्रातर्फे ठाणे जिल्हयातील येऊर या निसर्गरम्य ठिकाणी योगविद्येतून सामाजिकता आणि उद्योजकता या विषयावर दि.११ व १२ डिसेंबर २०१० रोजी कार्यशाळा आयोजित केली होती.
  • परीक्षा व तणावमुक्ती हि कार्यशाळा दहावीच्या विद्यार्थांकरिता डोंबिवली, नाशिक, विरार, उल्हासनगर,अमळनेर , पारोळा व धुळे इत्यादी ठिकाणी आयोजित केली होती.
  • ऐरोली येथे दि. ८ ते ११ मार्च २०११ रोजी स्थानिक लोकांसाठी प्राणायाम  शिबीर आयोजित केले होते.
Disclaimer