सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यटन -
सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यटन विभाग आयोजित
चित्रकूट तीर्थयात्रा दि.२५ ते २८ मार्च २०१०
 
पू. नानाजी देशमुख एक महान तपस्वी होते. त्यांनी आपल्या वयाच्या ७२ वर्षानंतर श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चित्रकूट या भूमीत समाजयज्ञ केला आहे.या महान तपस्व्याचे दि.२७ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने अशा कर्मयोग्याला त्याच्याच कर्मभूमीत जाऊन त्यांनी सुरु केलेल्या समाजयज्ञाची माहिती करून घेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल या विचाराने प्रेरीत होऊन दि. २५ ते २८ मार्च २०१० या कालावधीत विशेष रेल्वेने चित्रकूट तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेस समाजातून लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.या यात्रेत पू. नानाजींच्या कार्याची माहिती करून घेणे या उद्देशाबरोबरच रामघाट, कामदगिरी पर्वत, सती अनूसया आश्रम, गुप्त गोदावरी, स्पटिक शिला इत्यादी धार्मिक ठिकाणांचे दर्शन यात्रेकरूना घडविण्यात आले.
 
खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा
चित्रकूट तीर्थयात्रा दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०१०
 
सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यटन विभाग आयोजित
पानिपत वीरभूमी अभिवादन यात्रा
 
१४ जानेवारी २०११ रोजी पानिपत रण संग्रामाला २५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पानिपत रणसंग्राम हा मराठ्यांच्या पराभवाचा इतिहास नाही तर अभिमानाचा वर्षाचा विषय आहे आणि म्हणूनच पानिपत रणसंग्रामात धारातीर्थी पडलेल्या हजारो योध्यांना पानिपत येथे जाऊन मानवंदना देण्यासाठी विवेक व्यासपीठ व पानिपत रणसंग्राम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पानिपत वीरभूमी अभिवादन यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत पानिपतसह कुरुक्षेत्र, दिल्ली, आग्रा, वृंदावन, मथुरा आदी धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला होता. दि. ४ ते ३० डिसेंबर २०१० या कालावधीत पानिपत स्मृतीजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   
गो - तीर्थयात्रा - दि. ५ ते ९ एप्रिल २०११
 
भारताची कृषी प्रधान अर्थव्यवस्था हि प्रामुख्याने गोवंशाचे रक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याचे सेवाकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांचे कार्य जाणून घेण्यासाठी दि. ५ ते ९ एप्रिल २०११ या कालावधीत अकोला व जळ्गाव या ठिकाणी गो -तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत गोशाळाबरोबरच श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, जैन उद्योग समूह कृषी प्रकल्प आणि अजंठा लेणी इत्यादी ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता.
   
प्रयाग-काशी-अयोध्या तीर्थयात्रा - दि.५ ते ९ जानेवारी २०१२
   
Disclaimer