राष्ट्र सेवा समिती
राष्ट्र सेवा समिती वह्या वाटप
 
नरवीर चिमाजी अप्पा फिरता दवाखाना -
 
विवेक व्यासपीठ संचालित राष्ट्र सेवा समिती विरारच्यावतीने आसपासच्या ग्रामीण गरीब व गरजू लोकांकरिता दि. ३०/०१/२०११ पासून नरवीर चिमाजी अप्पा फिरता दवाखाना सुरु करण्यात आला असून आत्तापर्यंत हा दवाखाना पारुल, तामाला आणि भातानी या ३ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या २१-२२ गावे व ७२ पाड्यापर्यंत पोहोचला आहे. आजअखेर १५००० च्यावर रुग्णांनी तपासणी करून घेतली असून १५५० रुग्ण कायमस्वरूपी औषध घेत आहेत. दवाखान्यात खोकला, सांधेदुखी व ताप अशा विविध आजारांवर उपचार केले जातात.
याशिवाय समितीच्यावतीने संत गाडगेबाबा रुग्ण सहायक केंद्र, स्वामी विवेकानंद रुग्ण साहित्य केंद्र चालविण्यात येते. शिरसाड भागात दहिसर जि.प.शाळेत आणि कणेर गावातील वनवासी विद्यार्थी विद्यार्थीनीना शाळेची दप्तरे व वह्या वाटप करण्यात आल्या.
समितीचे स्वतःचे ए/जी २,सावरिया अपार्टमेंट, शनी मंदिरासमोर, १०० फिट रोड, नालासोपारा (प.)येथे कार्यालय आहे.
 
खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा
चित्रकूट तीर्थयात्रा दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०१०
 
सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यटन विभाग आयोजित
पानिपत वीरभूमी अभिवादन यात्रा
 
१४ जानेवारी २०११ रोजी पानिपत रण संग्रामाला २५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने पानिपत रणसंग्राम हा मराठ्यांच्या पराभवाचा इतिहास नाही तर अभिमानाचा वर्षाचा विषय आहे आणि म्हणूनच पानिपत रणसंग्रामात धारातीर्थी पडलेल्या हजारो योध्यांना पानिपत येथे जाऊन मानवंदना देण्यासाठी विवेक व्यासपीठ व पानिपत रणसंग्राम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पानिपत वीरभूमी अभिवादन यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत पानिपतसह कुरुक्षेत्र, दिल्ली, आग्रा, वृंदावन, मथुरा आदी धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला होता. दि. ४ ते ३० डिसेंबर २०१० या कालावधीत पानिपत स्मृतीजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   
गो - तीर्थयात्रा - दि. ५ ते ९ एप्रिल २०११
 
भारताची कृषी प्रधान अर्थव्यवस्था हि प्रामुख्याने गोवंशाचे रक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याचे सेवाकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांचे कार्य जाणून घेण्यासाठी दि. ५ ते ९ एप्रिल २०११ या कालावधीत अकोला व जळ्गाव या ठिकाणी गो -तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत गोशाळाबरोबरच श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, जैन उद्योग समूह कृषी प्रकल्प आणि अजंठा लेणी इत्यादी ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता.
   
प्रयाग-काशी-अयोध्या तीर्थयात्रा - दि.५ ते ९ जानेवारी २०१२
   
Disclaimer