वंचितांचे शिक्षण
आगामी प्रकल्प - वंचितांचे शिक्षण
 
भारतातील ग्रामीण भागातील बेकारी हा खूप महत्वाचा प्रश्न बनला आहे. आजवरचा अनुभव असा आहे कि, वेगवेगळ्या कारणांमुळे प्रचलित व्यवस्थेत या बेकारीला सामावून घेणे अशक्य ठरत आहे. त्यामुळ्ये या लोकसंख्येचा लोंढा शहराकडे वळत असून त्यातून कायदा व सुव्यवस्थेसह अनेक नागरी प्रश्न निर्माण झाले आहेत व भविष्यात होणार आहेत. आजची शिक्षण पद्धती हा या प्रश्नावर नव्या दिशेने  विचार करण्याची गरज आहे. या क्षेत्रात अनेक वर्षे काम केलेले  श्री. गिरीशजी प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या व अन्य कार्यकर्त्याच्या  अनुभवातून वंचितांचे शिक्षण हा उपक्रम सुरु करण्याची योजना व्यासपीठाने आखली आहे.ही योजना सुरुवातीला सर्वेक्षण नंतर एक कार्यशाळा व प्रत्यक्ष अंमलबजावणी अशा टप्प्यातून साकारली जाईल. योजनेची भूमिका व अन्य तपशील खालील प्रमाणे -
   
  भूमिका -
  पारंपारिक कौशल्य व आधुनिक शिक्षण यांचा समन्वय
 

१) भारतात बारा बतुतेदार, कारागीर, भटके विमुक्त, अनुसूचित जाती जमाती (एससी, एसटी) तसेच अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर असा जवळ जवळ ७० ते ८० कोटींचा वर्ग आहे. यातील अंदाजे पाच ते सहा कोटी वर्ग आधुनिक शिक्षण, औद्योगिकरण, तंत्र शिक्षणाने आधुनिक व्यवस्थेत सामावून गेला आहे. उर्वरित समाज आजही अधांतरीच चाचपडत आहे. ना पारंपारिक कारागिरी उद्योग चालत, ना शेती परवडत. आधुनिक सुधारणा, सुविधा अगदी दारात उभ्या असतानाही तो बावरून गेला आहे. तसं पाहिलं तर त्याच्याकडे कला, कौशल्य आहे. गेली पाच हजार वर्षे तो त्या कारागिरीवरच जगात आला आहे. त्याच्या कारागिरीमुळेच इतिहास काळात भारत समृद्ध व वैभवसंपन्न बनला होता. 
२)याला याच्या कारागिरीशी वा कला कौशल्याशी निगडीत अशा आधुनिक तंत्रज्ञानाची  व संकल्पनांची जोड त्याच्या भाषेत व भाविश्वात जाऊन दिली तर कारागिरांच्या वस्त्या आधुनिक कौशल्याने युक्त अशा स्वयंपूर्ण औद्योगिक वसाहती बनतील. या वस्त्या त्या त्या भागातील विकासाशी जोडल्या जातील.
३) हे करण्याआधी प्रथम सर्वेक्षण करावे लागेल.या सर्वेक्षणाचे  तीन भाग पडतील.
अ) सद्यस्थिती की आहे ?
ब)संभाव्य विकासक्षेत्रे व त्यांची स्थिती.
क)या राज्यात व इतर राज्यात झालेले प्रयोग.
४)सद्यस्थितीच्या सर्वेक्षणाकरिता प्राथमिक दृष्टया खालील प्रमाणे विभागणी करावी लागेल.
अ)धातुकामाशी निगडीत जाती, जमाती. उदा. लोहार, घिसाडी, गाडी लोहार, ओतारी, सिकलकरी इ.
ब)बांधकामाशी निगडीत जलर, जमाती. उदा. गवंडी, वडार,पाथरवट, कुंभार, सुतार, बेलदार इ.
क)आरोग्य किंवा पर्यावरणाशी जोडलेल्या जाती, जमाती. उदा. वैदू, नंदीबैलवाले, रामनामी.
ड)सांस्कृतिक, कला उदा. वारली, डोंबारी, गोपाल, गोसावी, गोंधळी,भराडी, वासुदेव,चित्रकथी, दशावतारी, बहुरूपी, नाथपंथी इ.
इ)शारीरिक कौशल्य उदा. डोंबारी, कोलाटी
या शिवाय काही विशेष कौशल्य असलेल्या जाती, जमाती उदा. फासे पारधी, भिल्ल, बेरड, रामोशी, मातंग, चर्मकार, पशुपालन करणाऱ्या धनगर इ., कोष्टी, मासेमारी करणाऱ्या , रेशीम उत्पादनाशी जोडलेल्या, बुरुड, कैकाडी, कोकणा, गोंड, माडिया इ.
या सर्व पारंपारिक कौशल्ये असलेल्या कारागिरांना त्यांच्याकडे असलेले ज्ञान व कौशल्य गृहीत धरून त्यांना त्यांच्याशी  निगडीत आधुनिक प्रशिक्षण दिले, त्यांना संगणक प्रशिक्षित केले,त्यांच्यात थोडी आधुनिकता आणली तर त्यांच्या जीवनाला गती मिळेल, त्यांच्या कारागिरी कौशल्याचे चीज होईल, त्यांच्या आर्थिक विकासाला सुरुवात होईल, सामाजिक समरसता निर्माण होऊन विषमता कमी होण्यास हातभार लागेल.

   
Disclaimer