सामाजिक व्यक्ती समाजासाठी आपला वेळ, बुद्धिमत्ता, संपत्ती यांचा उपयोग कसा करतात यावर त्या समाजाचा विकास अवलंबून असतो. समाजाला समृद्ध करण्यासाठी झटणे हे आपल्यावरील समाजऋण आहे. आपण हे फेडण्यासाठी खालीलप्रमाणे सहकार्य करू शकता -
  • आमच्या समाजातील कार्याला आपण वस्तुरूपाने मदत करू शकता व दुर्बळ आणि गरजू समाजघटकांसाठी अन्न व वस्त्र यांची मदत करू शकता.
  • आपण कार्यकर्ता म्हणून अथवा अन्य प्रकारे आमच्या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता आणि या क्षेत्रातील समृद्ध अनुभव मिळवू शकता.
  • आमचे कार्यक्रम आणि उपक्रम अधिक परिणामकारकपणे आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्हाला अर्थबळाची आवश्यकता  आहे. समाजातील दुर्बळ घटकांसाठी नवनवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी आपण आम्हाला देणगीरूपाने आर्थिक सहकार्य करू शकता.

आम्हाला देण्यात येणाऱ्या सर्व देणग्या आयकर कायदा ,१९६१ कलम ८०जी अन्वये करसवलतीस पात्र आहेत.

तपशील व माहितीसाठी संपर्क
श्री. शहाजी म. जाधव
भ्रमणध्वनी - ९८६९४३९१२१
प्रमुख - अर्थ विभाग

Disclaimer