राष्ट्र सेवा समितीच्या वतीने स्कूल बॅग व वह्या, पेन्सिल यांचे वाटप
राष्ट्र सेवा समितीच्या वतीने स्कूल बॅग व वह्या, पेन्सिल यांचे वाटप करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे ५०० बॅग व दुहेरी व चाररेघी वह्या मंगळवार दि. १०/०७/२०१० रोजी सकाळी ११.०० वाजता शिरसाड - भागात दहिसर जि. प. शाळेत तसेच कणेर गावातील वनवासी विद्यार्थी-विद्यार्थीनींना (५००) शाळेची दप्तरे श्री. प्रदीप गुप्ता व श्री. शौकिन कुमार जैन यांच्या हस्ते देण्यात आली. दप्तराकरीता श्री. शौकिन कुमार जैन यांचे चांगले सहकार्य मिळाल्याचे श्री. प्रदीप गुप्ता यांनी सांगितले. या कार्यक्रमास समितीचे श्री. दिनेश सकपाळ, श्री. शेखर अभ्यंकर, श्री. सतीश वझे तसेच स्थानिक कार्यकर्तेही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. सभेच्या वतीने राष्ट्र सेवा समिती व इतर कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
Disclaimer